ट्रेकिंग, भटकंती

Posted By : admin/ 2116 0

ट्रेकिंग, भटकंती , हा माझा सर्वात आवडता छंद आहे. सांधन दरी, ह्या ट्रेक डेस्टीनेशनला जान्याची माझी खूप इच्छा होती. साल २०१७ च्या पहिल्याच महिन्यात माझी इच्छा पूर्ण झाली.

मुंबई मधील, दहिसर येथील “सावे टुर्स अँड ट्रेक्स” या संस्थेच्या वतीने “सांधन दरी” या ठिकाणी ट्रेक आयोजित करण्यात आली होती. मी व माझे काही महाविद्यालयीन मित्र यात सहभागी झालो होतो.

२१ जानेवारी २०१७ च्या रात्री १०.३० वाजता आम्ही बोरिवली येथे बस मधे बसलो.रात्री च्या प्रवासात बस मधे काही नवीन मित्र बनवता आले. शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत असलेला “श्री ओमकार मुळे”, याची गाडीत मस्त मैफील रंगली.

२२ जानेवारीला सकाळी ६.०० वाजता आम्ही “साम्रद” या गावी पोहोचलो. कळसुबाई, रतनगड, अलंग, मदन, कुलंग, हे पर्वत सुद्धा आपल्याला ह्या गावातून दिसतात.चहा नाष्टा व जेवनाची सोय, ह्या गावात करण्यात आली होती. गरमा गरम चहा व नाष्टा करून, सगळे ताजे-तवाने झाले.

सकाळी ९ः०० च्या सुमारास  छत्रपती शिवरायांच्या घोषणा देऊन आम्ही ट्रेक ला सुरूवात केली. या ट्रेक चा पहिला टप्पा होता “कोकण कडा”.

पावसाळ्यात ह्या ठिकाण उलटा धबधबा वाहत असतो. तिथुन मग आम्ही सर्व ट्रेकर्स मुख्य वाटेच्या दिशेने निघालो.दाट जंगल, वेडी-वाकडी वळणं, वाटेच्या मधेच असलेला पाण्याने भरलेला ओढा, मोठ मोठाली दगडं, रूंद – अरूंद आशा वाटा, असा तब्बल दोन तासांचा खडतर प्रवास आम्ही केला. दुपारी सुमारे १२:३० च्या दरम्यान आम्ही लास्ट पाँईंट ला पोहोचलो. सुंदर दरी व उंच कडे, असा हा परिसर होता. ही ट्रेक पूर्ण केल्याचा आनंद सर्वांना झाला होता. केणी काका, यांनी दिलेल्या शिवरायांच्या घोषणांनी आक्की दरी दणाणून गेली. सर्वांनी त्यांच्या घोषणेला जबरदस्त प्रतिसाद दिला. थोडी विश्रांती घेऊन मग आम्ही परती चा प्रवास धरला.

परत येत असताना,वाटेत काही माथेफीरू लोकांनी टाकलेला कचरा आम्ही गोळा केला. वाटेतल्या त्या ओढ्यात सगळे मनसोक्त भिजले. दुपारी दोन च्या दरम्यान आम्ही पुन्हा गावाकडे आलो.

गावात आल्यावर सर्वांनी, कोंबडीच्या झणझणी चिकणवर ताव मारून आपली भूक भागवली.

दुपारी चार च्या सुमारास आम्ही गाडीत बसलो. वाढलेला आत्मविश्वास व काही आठवणी मनात घेऊन आम्ही परतीचा प्रवास धरला. ही ट्रेक माझ्यासाठी फारच आविस्मरणिय ठरली. सर्वांनी आयुष्यात एकदा तरी या ठिकाणी जरूर भेट द्या.

  • Phasellus tincidunt, quam ac hendrerit molestie.

  • Etiam nulla lectus, dictum ut lobortis a, blandit sed nisi..

  • Integer in purus et lectus accumsan tempor ac nec nulla.

  • Vivamus varius erat justo, in vestibulum ipsum rutrum tristique..