Category: The world

कळसुबाई- एक भावनात्मक सफर

Posted By : admin/ 2411 1

कळसुुबाई शिखराची ट्रेक माझ्यासाठी नेहमीच स्पेशल असते. अशीच ट्रेक आम्ही यंदा दिवाळीच्या आधी आयोजित केली होती. पण या ट्रेक ला काहीतरी वेगळं करण्याचा विचार माझ्या मनात आधी पासून होता. कळसुबाईच्या पायथ्याशी असलेल्या बारी गावाला मी अनेकदा भेट दिलेली. कळसुबाईच्या कुशीत लपलेले हे छोटेसे परंतु निसर्गाचे वरदान लाभलेले गाव! कळसुबाई म्हणजे महाराष्ट्रातले सर्वात उंच शिखर. दरवर्षी येथे हजारो ट्रेकर येऊन जातात . एवढे सर्व असून सुद्धा बारी गावातील परिस्थिती हलाखीची आहे. गाव अजुन ही गरिबीच्या छायेखाली आहे . याच गावातील लोकांसाठी काहीतरी छोटीशी मदत करायचे असे मी ठरवले . २३ ऑक्टोबर ला आम्ही एकूण ५७ ट्रेकर्सनी कळसुबाई सर केला. मी सर्व ट्रेकर्स ना आपल्या सोबत येताना वापरण्या योग्य असे कपडे सोबत आणण्यास सांगितले .

कळसुुबाई शिखराची ट्रेक माझ्यासाठी नेहमीच स्पेशल असते. अशीच ट्रेक आम्ही यंदा दिवाळीच्या आधी आयोजित केली होती. पण या ट्रेक ला काहीतरी वेगळं करण्याचा विचार माझ्या मनात आधी पासून होता. कळसुबाईच्या पायथ्याशी असलेल्या बारी गावाला मी अनेकदा भेट दिलेली. कळसुबाईच्या कुशीत लपलेले हे छोटेसे परंतु निसर्गाचे वरदान लाभलेले गाव!  कळसुबाई म्हणजे महाराष्ट्रातले सर्वात उंच शिखर. दरवर्षी येथे हजारो ट्रेकर येऊन जातात . एवढे सर्व असून सुद्धा बारी गावातील परिस्थिती हलाखीची आहे. गाव अजुन ही गरिबीच्या छायेखाली आहे . याच गावातील लोकांसाठी काहीतरी छोटीशी मदत करायचे असे मी ठरवले . २३ ऑक्टोबर ला आम्ही एकूण ५७ ट्रेकर्सनी कळसुबाई सर केला. मी सर्व ट्रेकर्स ना आपल्या सोबत येताना वापरण्या योग्य असे कपडे सोबत आणण्यास सांगितले . ट्रेकर्सनी सुद्धा आमच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद दिला . ट्रेक पूर्ण झाली आणि आम्ही परतीसाठी निघणार त्या आधी मी गावातील एका ओळखीच्याला सोबत घेऊन सर्व लहान मुले व गावकरी यांना जमा केले. त्यांच्यांमध्ये ते कपडे वाटण्यात आले . दिवाळी च्या आधी मिळालेले हे त्यांच्यासाठी surprise गिफ्ट च होते जणू.सर्वांचे चेहरे आनंदाने फुलून गेले . कपडे वाटताना तरुणांमध्ये मोठा उत्साह दिसत होता. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर सर केल्या सोबतच आपण काहीतरी सामाजिक कार्य केले आहे याच समाधान सर्व ट्रेकर्सना वाटत होते. हेच समाधान घेऊन सर्व ट्रेकर्स पुन्हा मुंबई -आपल्या घरी रवाना झाले. अशा या तरुण पिढीला साहस व सामाजिक बांधिलकीची जाण आहे याची जाणीव प्रकर्षाने मला या ट्रेक मध्ये आली आणि अशा क्रांतिकारी विचारांच्या तरुणांसोबत ही ट्रेक यशस्वीरित्या पार पडली,याचा मला फार अभिमान वाटतो.